सिंचन घोटाळा; अविनाश भोसले पुन्हा वादात

गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे अविनाश भोसले पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 3, 2012, 09:36 AM IST

www.24taas.com, गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे अविनाश भोसले पुन्हा एकदा चर्चेत आलेत.
पर्यावरण खात्याची मंजुरी मिळण्यापूर्वीच कंत्राटदाराला २१६ कोटींची खिरापत वाटण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते प्रवीण महाजन यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या कामाचं कंत्राट पुण्यातील वादग्रस्त बिल्डर अविनाश भोसले यांच्या सोमा एंटरप्राईजेस या कंपनीला देण्यात आल्यानं, संशयाला जागा निर्माण झालीये. सर्वसाधारणपणे एका टेबलावरून दुस-या टेबलवर फाईल जायला महिनो-न-महिने लागतात. पण, विशेष बाब म्हणून एका दिवसात या प्रकल्पाची फाईल मंजूर करण्यात आली.
या योजनेपासून तिरोडा, गोंदिया ,गोरेगाव, सडक अर्जुनी आणि भंडारा जिल्ह्य़ातील साकोली, मोहाडी, लाखांदूर व भंडारा या ८ तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार आहे. या योजनेपासून ९८ हजार ५५८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.परंतु, मागील १० वर्षापासून या सिंचन प्रकल्पाचे दुसऱ्या टप्प्याचे काम सोमा कंपनीला देण्यात आले आहे.