विदर्भात भाजपचं वर्चस्व, मुख्यमंत्र्यांच्या गावी भाजपची सत्ता

विदर्भामध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव असलेल्या चंद्रपूरच्या मूलमध्ये 17 पैकी 16 जागा भाजपनं जिंकल्या. 

Updated: Nov 28, 2016, 03:14 PM IST
विदर्भात भाजपचं वर्चस्व, मुख्यमंत्र्यांच्या गावी भाजपची सत्ता title=

चंद्रपूर : विदर्भामध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव असलेल्या चंद्रपूरच्या मूलमध्ये 17 पैकी 16 जागा भाजपनं जिंकल्या. 

वर्धा आर्वीमध्ये भाजपनं सर्वच्या सर्व 23 जागा जिंकल्या. वाशिम वरोरा आणि तेल्हारा मूर्तिजापूरमध्येही भाजपचं कमळ फुललं. अकोला बाळापूरमध्ये काँग्रेसच्या खतीब घराण्यानं वर्चस्व राखलं. तिथं भाजप आणि भारिप बहुजन महासंघाला भोपळाही फोडता आलं नाही. 

पातूरमध्ये राष्ट्रवादी विजयी झाली, पण नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला. यवतमाळ पुसदमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारली. बुलढाण्यात भारिप बहुजन महासंघाच्या नजमुन्नीसा सज्जाद विजयी झाल्या.