www.24taas.com , झी मीडिया, वर्धा
ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.
एडीस नावाच्या डासाची मादी चावल्यानं डेंग्यू होत असून, डोकं दुखी, ताप, सांधे दुखी या सारखे लक्षणं यामध्ये दिसून येतात. हा डास चावल्यानं रक्तातील पेशींचं प्रमाण कमी होतं आणि त्यावर योग्य वेळी उपचार न झाल्यास रुग्ण दगावतो. त्यामुळं याबाबत लगेच खबरदारी घेणं गरजेचं आहे.
ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आता युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्यात. वर्ध्यातील आठही तालुक्यांत फॉगींग सुरू करण्यात आलंय. प्रशासनाकडून गाव आणि शहरात रहाणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.