www.24taas.com,झी मीडिया, नाशिक
पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्याला मुँहतोड जवाब दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलाय.
जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात ५ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यामुळं भारतवासीयांच्या मनात असलेली संतापाची भावनाच अण्णा हजारेंनी बोलून दाखवली.
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात संताप उसळलाय. अजून किती हल्ले आपला देश सहन करणार असल्याचा सवाल मुंबईकरांनी विचारलाय. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याविरोधात राजधानीत निदर्शनं करण्यात आली. युवक काँग्रेसनं निदर्शनं करत पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर पाकिस्तानच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलीय.
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा शिवसैनिकांनी पुणे आणि नाशिकमध्ये निषेध केला. नाशिकच्या शालिमार चौकात पाकिस्तानचे पंतप्रधान नवज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचं दहन करण्यात आलं. तर पुण्यातही सिंहगड रस्त्यावरच्या आनंदनगर चौकात निदर्शनं करण्यात आली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.