कांदा उत्पादकांना वाव, कांद्याला चांगला भाव

गेल्या काही दिवसांत अनेक संकटांचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 25, 2012, 03:31 PM IST

www.24taas.com, नाशिक
गेल्या काही दिवसांत अनेक संकटांचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे.
उमराणे बाजार समितीत प्रती क्विंटल २१२१ रुपये भाव मिळाल्याने शेतकरी आनंदात आहे. गेल्या महिन्यात हेच भाव सहाशे सातशेच्या दरम्यान होते तर पंधरा दिवसापूर्वी एक हजाराच्या दरम्यान होते. मात्र कांद्याची आवक कमी झाल्याने आठ दिवसापासून भाव वाढले आहे.
पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने कांद्याची लागवड उशिरा झाली होती.त्यामुळे दिवाळीत कांद्याचे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.किरकोळ बाजारत अजून कांद्याचे भाव दहा ते पंधरा रुपये किलो असून पुढील आठवड्यात या भावाचा परिणाम होईल.