www.24taas.com, झी मीडिया, धुळे
पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशातील दुस-या क्रमाकाचा घोडा...बाजार म्हणून सारंगखेड्याचा घोडे बाजार ओळखला जातो.. यंदा या घोडेबाजारात जवळपास पावणेदोन कोटींची उलाढाल झालीय.. वाद्या आणि घुंगराच्या तालावर नाचणारा हा घोडा आहे धुळ्याच्या सारंगखेडा घोडे बाजारातला..
काळे, पांढरे आकर्षक घोडे या बाजारात पाहायला मिळतात.. त्यात भंवर आणि शुभ समजला जाणारा पंचकल्याण या घोड्याचा समावेश असतो...इथला घोडेबाजार अश्वप्रेमींसाठी पर्वणी असतो.. दरवर्षी या बाजारासाठी देशभरातून अश्व व्यापारी आणि अश्वप्रेमी हजेरी लावतात.. त्याला कारण आहे ते शुभ लक्षणी आणि देशाच्या विविध प्रांतातले वेगवेगळ्या जातीचे घोडे तसंच त्याच्यासाठी लागणारे साहित्य..
यंदा या बाजारात देशभरातून १८६५ घोडे विक्रीसाठी दाखल झालेत. त्यापैकी ६८३ घोड्यांची विक्री झाली असून चार दिवसांत जवळपास पावणे दोन कोटींची उलाढाल झालीय.. या वर्षी उत्तप्रदेशातल्या अस्लम पठाण यांचा बादल हा घोडा ११ लाखाला विकला गेलाय..
ऐतिहासिक परंपरा असलेल्या सारंगखेडा बाजारातून लाखोंची उलाढाल होते.. अश्वप्रेमींसाठी पर्वणी असणा-या या घोडेबाजाराला पर्यटनदृष्ट्या चालना मिळण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे..
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.