www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून महापुरुषांची होणारी बदनामी, त्यानंतर समाजात निर्माण होणारा तणाव थांबविण्यासाठी नाशिक शहरातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय.
हुतात्मा स्मारकात आज सर्व पक्षीय विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारी एकत्र आलेत.त्यांनी व्हॉटस्अॅप,फेसबुकच्या माध्यमातून होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट शेअर, लाईक न करण्याची शपथ घेतली.
महाविद्यालयांच्या सुरवातीलाच सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत सोशल मीडियाचा गैरवापर थांबविण्यासाठी जनजागृती करणं, विरोधी पक्षातील नेत्यांविषयीचे आक्षेपार्ह फोटे फॉरवर्ड न करणं, पोलिसांना गैरवापराच्या कारवाई बाबतीत सहकार्य करण्याचा निर्धार या तरुणांनी केलाय. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या नावानं टीकेची झोड उठविणारे, विरुद्ध दिशेला तोंड असणारे तरुण एका चांगल्या कामासाठी एकत्र आले हे सुद्धा या मोहिमेचं यश म्हणावं लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.