शनिशिंगणापुरात चौथाऱ्यावर चढण्याचा पुन्हा महिलांकडून प्रयत्न

शनि शिंगणापूर येथे शनि चौथाऱ्यावर चढण्याचा पुन्हा महिलांकडून प्रयत्न झाला. भूमाता ब्रिगेड संघटनेच्या चार महिलांनी शनि चौथर्यावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांना अडवताच या महिला आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाली.

Updated: Dec 21, 2015, 08:35 AM IST
शनिशिंगणापुरात चौथाऱ्यावर चढण्याचा पुन्हा महिलांकडून प्रयत्न  title=

शनि शिंगणापूर : शनि शिंगणापूर येथे शनि चौथाऱ्यावर चढण्याचा पुन्हा महिलांकडून प्रयत्न झाला. भूमाता ब्रिगेड संघटनेच्या चार महिलांनी शनि चौथर्यावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांना अडवताच या महिला आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाली.

त्यानंतर या महिलांनी शनि चौथ-याजवळ घोषणाबाजीही केली. आणि थेट शिंगणापूर पोलिस ठाण्यात जाऊन अडवणूक केलेल्या चार सुरक्षा रक्षकांविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल केला.

महिलांना शनि चौथ-यावर जाऊन दर्शनाची परवानगी द्या अशी मागणी यावेळी या महिलांनी केलीये. तशी परवानगी न दिल्यास 400 महिला आणून शनि चौथ-यवर जाऊन दर्शन घेऊ असा इशारा यावेळी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी दिलाय.