www.24taas.com, झी मीडिया, धुळे
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा गावातील योगेश धनगर खूनप्रकरणात तीन पोलीस अधिकारी तसेच एका डॉक्टरला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोलिस निरिक्षक अशोक इंगळे, एपीआय प्रकाश महाजन, प्रशिक्षणार्थी पीएसआय दीपक म्हेत्रे आणि डॉक्टर प्रणील पडियार या चौघांना सक्त मजुरी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी विलास साळवेला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
दोंडाईचाच्या योगेश धनगर या युवकाचा ऑक्टोबर २०१० मध्ये पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप होता.
योगेश धनगरची काही लोकांशी बाचाबाची झाली होती. यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेलं. पोलिसांनी योगेशला बेदम मारहाण केल्याने तो जबर जखमी झाला, असा आरोप पोलिसांवर आहे.
यानंतर पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या योगेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतांना योगेशचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी डॉक्टर पडियार यांच्याकडून खोटं प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी डॉक्टरला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. योगेशला मारहाण करणाऱ्यांमध्ये महाजन, म्हात्रे आणि साळवे या पोलिसांचा समावेश आहे, यांनाही सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
योगेश मृत्युची योगेशच्या वडिलांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी केली होती. या नंतर चौकशी दरम्यानच 3 पोलिस आणि डॉक्टरवरील आरोप ठेवण्यात आले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.