www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर
९४ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन यावर्षी पंढरपूरमध्ये होणार आहे. नाट्य परिषदेच्या बैठकीनंतर अध्यक्ष मोहन जोशी यांनी मुंबईत आज ही घोषणा केली.
पंढरपूरसह सातारा आणि नागपूर ही ठिकाणं यावर्षी स्पर्धेत होती. अखेर पंढरपूरमध्ये नाट्य संमेलन होणार असल्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं. १ आणि २ फेब्रुवारी २०१४ रोजी हे नाट्यसंमेलन रंगणार आहे. पंढरपूर हे तिर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध असून त्या अनुषंगाने आगामी नाट्य संमेलनात काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.
नागपूर, सातारा व पंढरपूर या तीन शाखांकडून निमंत्रणं आल्यानंतर नाट्यसंमेलनच्या कार्यकारिणीने या तिन्ही ठिकाणची पाहणी देखील केली होती. संमेलनाच्या आयोजनाचा मान नेमका कुणाला मिळेल? यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी दुपारी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकारिणीने पंढरपूरमध्ये संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. यंदाचे संमेलनाचे अध्यक्षपद अरुण काकडे भूषवणार आहेत. ३१ जानेवारीला संमेलनाच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम पार पडेल, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.