गगन नारंगला एअर फ्रांसने विमानात प्रवेश नाकारला

ऑलिम्पिक विजेता गगन नारंग आणि त्यांच्या ग्रुपला पॅरीस एअरपोर्टवर एअर फ्रांसने विमानात प्रवेश नाकारला.

Updated: Apr 7, 2014, 10:59 AM IST

www.24taas.com, झी मीडिया
ऑलिम्पिक विजेता गगन नारंग आणि त्यांच्या ग्रुपला पॅरीस एअरपोर्टवर एअर फ्रांसने विमानात प्रवेश नाकारला. गगन नारंग आणि त्यांच्या ग्रुपकडे बंदूक असल्याचे कारण देत एअर फ्रांसने विमान प्रवेशाला विरोध केला होता. पण नंतर गगन नारंग यांनी हे प्रकरणवरच्या प्रतिनिधींपर्यंत नेऊन हा विषय संपवला.
अमेरीकामध्ये शुटिंग वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेऊन त्यात पाचव्या स्थानावर राहण्याची कामगिरी गगन नारंगने केली. अमेरीकेतुन मायदेशी परतत असताना फ्लाइट बोर्ड करत असताना गगन नारंग यांच्या सामानात बंदूक सापडली. गगन नारंग हे शूटर असल्याने त्यांच्या जवळ शूटिंगच सामान आणि शूटिंग गन ही असतेच.
नारंगने आपली नाराजी फेसबुकवर एक एअरपोर्टचा फोटो आणि पोस्ट टाकून जाहीर केली.
नारंगने या पोस्टमध्ये म्हटलंय "हे आश्चर्यकारक आहे. एअर फ्रांसने आम्हाला विमानात चढू नाही दिलं आणि जेव्हा आम्ही न्यू जर्सीवरुन पॅरीसमध्ये पोहचलो, तेव्हा आमच्यासाठी गेट बंद करण्यात आले. ते म्हणाले की तुमच्याकडे हत्यार आहे आणि आम्हाला डेल्टाने ही माहिती दिली नाही, म्हणुन तुम्ही विमानात बसू शकत नाही. वेळ कमी आहे. ते आता आमचं सामान आणि बंदुकांची पुन्हा तपासणि करत आहेत."
शेवटी, एअर फ्रांसला आपली चूक लक्षात आली आणि गगन नारंग आणि त्यांच्या ग्रुपला विमानात प्रवास करण्यास परवानगी मिळाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.