www.24taas.com, न्यूयॉर्क
अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅमवर ब्रिटनच्या अॅन्डी मरेनं आपलं नाव कोरलंय. मरेनं नोवाक जोकोव्हिचला ७-६, ७-५, २-६, ३-६, ६-२ अशा पाच सेट्समध्ये पराभूत केलंय. ब्रिटनचा टेनिसपटू असलेल्या अॅन्डी मरेनं आपल्या करिअरमधल्या पहिल्या ग्रॅन्ड स्लॅमला गवसणी घातली असून गेल्या ७६ वर्षांमध्ये ग्रॅन्ड स्लॅम जिंकणारा तो पहिला ब्रिटीश टेनिसपटू ठरलाय.
सोमवारी झालेल्या यूएस ओपन फायनलमध्ये पुरुष ग्रॅन्ड स्लॅम चॅम्पियन स्पर्धेत नोवाक जोकोव्हिचवर मात केली. जोकोविच हा २०११ च्या अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅमचा विजेता होता. ही ग्रॅन्ड स्लॅम जिंकणारा मरे हा ब्रिटनचा गेल्या ७६ वर्षांतील पहिलाच टेनिसपटू ठरलाय. त्यामुळे एकप्रकारे त्यानं ब्रिटनची स्वप्नपूर्तीच यानिमित्तानं साकारलीय. याआधी १९३६ साली ब्रिटनच्या फ्रेड पेरी यानं हा किताब पटकावला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्या पुनर्नियुक्तीचा आणि स्पॅनिश नागरि युद्धाचा हा काळ होता.
‘जोकोव्हिच खूप उत्तम खेळाडू आहे... त्याच्याशी लढा देणं खरंच माझ्यासाठी कठिण ठरलं’ कशी कबूली मरेनं विजय मिळवल्यानंतर दिलीय.