फुटबॉल वर्ल्डकप ब्राझीलच जिंकणार, चाहत्यांचा विश्वास

जून महिन्यात होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपची सगळेच फुटबॉल प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.

Updated: May 1, 2014, 02:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ब्राझील
जून महिन्यात होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपची सगळेच फुटबॉल प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच सोशल मीडियावर फुटबॉल फॅन्सचा जोर वाढतोय. ट्विटवरुनही ब्राझीलला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. फिफा फुटबॉल वर्ल्डकपवर गेल्या वेळी स्पेनने आपली दावेदारी सिद्ध केली होती. आता मात्र चाहत्यांना ब्राझीलच जगजेत्ता होणार असं वाटत आहे.
ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमार आणि टीम कोच लुइस फेलिपे स्कोलारी ही जोडी ब्राझीलला वर्ल्डकप जिंकुन देण्यात यशस्वी होतील, असा दावा चाहत्यांनी ट्विट करून केला. ब्राझीलने २००२मध्ये वर्ल्डकप जिंकला होता, तेव्हा स्कोलारीच टीमचे कोच होते. तसेच स्कोलारींच्या मार्गदर्शनाखालीच घरच्या मैदानावर ब्राझीलने कन्फॅडरेशन कप जिंकला होता.
ब्राझील स्टार प्लेयर नेयमार याच्या बाबतीत बोलताना ब्राझीलचा माजी वर्ल्डकप विजेता कॅप्टन कफू म्हणतो की, नेयमार २२ वर्षांचाच असला तरी तो जबाबदारी घेण्यापासून घाबरत नाही, त्याने आता पर्यंत ब्राझीलसंघात खेळताना ४८ मॅचेसमध्ये ३३ गोल केले. या कारणाने नेयमार हा वर्ल्डकपमध्ये आपला चांगला खेळ दाखवेल.
नेयमार हा पेले यांच्या पंक्तीत स्थान मिळवून ब्राझीलला घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकून देईल, असे मत ट्विटरवर फुटबॉलप्रेमींनी व्यक्त केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.