फिफा वर्ल्डकप 2014 : पोर्तुगालची मदार रोनाल्डोवर!

पोर्तुगाल आणि जर्मनीमध्ये आज हाय व्होल्टेज मॅच फुटबॉल प्रेमींना पाहायला मिळणार आहे. पोर्तुगालाचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डो या मॅचमध्ये खेळणार असल्य़ानं जर्मनीची डोकेदुखी वाढली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 16, 2014, 07:14 PM IST

Www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पोर्तुगाल आणि जर्मनीमध्ये आज हाय व्होल्टेज मॅच फुटबॉल प्रेमींना पाहायला मिळणार आहे. पोर्तुगालाचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डो या मॅचमध्ये खेळणार असल्य़ानं जर्मनीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे रोनालडोला रोखण्याचं मोठ आव्हान जर्मनीसमोर असेल.
ख्रिस्तियानो रोनाल्डो वर्ल्ड कपच्या आपल्या सलमीच्या लढतीत खेळणार की नाही यावर अखेर पडदा पडलाय. जर्मानीविरुद्ध खेळण्यास आपण 100 पर्संट फिट असल्याचं त्यानं म्हटलंय. त्यामुळे पोर्तुगालाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. रोनाल्डो खेळणार असल्यानं आता मॅचमध्ये त्याच्यावरच अवघ्या फुटबॉल जगताच्या नजरा खिळणार आहेत.
ख्रिस्तियानो रोनाल्डो... पोर्तुगालाचा स्टार स्ट्रायकर आणि विंगर... आपल्या आक्रमक फुटबॉलसाठी तो फुटबॉल विश्वात ओळखला जातो. वर्सेटाईल अटॅकर म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. पेस, स्किल, बॉलवरचा कंट्रोल आणि ड्रिबलिंग ऍबिलिटीसाठीही रोनाल्डो फुटबॉल जगतामध्ये लोकप्रिय आहे.
गेल्या सीझनमध्ये त्यानं रिअल माद्रिदकडून खेळतांना गोलचा धडाका लावला. यामुळे त्याला फिफाच्या बलून डोर पुरस्कारानही गौरवण्यात आलं होतं. आपल्या करिअरधील सर्वोत्तम फुटबॉल रोनाल्डो खेळतोय अशी प्रतिक्रिया माजी फुटबॉलपटूंनी त्याचा खेळ पाहून व्यक्त केली. कायमच मेसी श्रेष्ठ की, रोनाल्डो याची चर्चा फुटबॉल जगतामध्ये होत असते. रिअल माद्रिदचे मॅनेजर होजे मॉरिनो यांनी तर मेसी आणि रोनाल्डो वेगवेगळ्या एरामध्ये जन्मले असते. तर त्यांनी फुटबॉल विश्वावर आपलं अधिराज्य गाजवलं असतं. त्याचप्रमाणे या दोघांना प्रत्येकी 10-10 बलून डोर पुरस्कारही मिळाले असते.
सुरुवातीला आपल्या बेताल वागण्यामुळे फुटबॉल जगतामध्ये त्याची ओळख ऍरॉगन्ट बॉयची झाली होती. मात्र, त्यानं खेळावर आपलं लक्ष अधिक केंद्रीत केलं आणि फुटबॉल जगतामध्ये एकच धुमाकूळ घातला. रिअल माद्रिदकडून तो जा त्वेषानं खेळतो त्याचं त्वेषानं तो पोर्तुगालसाठी खळतो. 2012 मध्ये त्यानं पोर्तुगालसाठी आपली 100 वी मॅच खेळली. 100 मॅचेस खेळणारा तो जगातील तिसरा यंगेस्ट फुटबॉलर ठरला होता.
वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसमध्येही रोनाल्डोचा जलवा फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळाला. क्वालिफाईंग मॅचेसमध्ये त्यानं आठ गोल झळकावले होते. गेम चेंजर म्हणूनही रोनाल्डोकडे पाहिलं जातं. आपल्या फुटबॉल करिअरमध्ये त्यानं सर्वाधिक गोल हे हेडरवर केले आहेत. पोर्तुगालचा हा स्टार स्ट्रायकर आता फुटबॉल वर्ल्ड कपमध्येही सर्वाधिक गोल झळकावण्यात यशस्वी ठरतो का ते पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.