फिफा वर्ल्डकप : कोस्टा रिकाचा उरुग्वेवर 3-1 नं विजय

कोस्टा रिकानं उरुग्वेवर 3-1 अशा फरकानं विजय मिळवलाय. `ग्रुप डी`च्या सामन्यात 23 व्या मिनाटाला उरुग्वेचा एडिसन्स कवानीने पेनल्टी किकवर गोल केला.

Updated: Jun 15, 2014, 05:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोस्टा रिकानं उरुग्वेवर 3-1 अशा फरकानं विजय मिळवलाय. `ग्रुप डी`च्या सामन्यात 23 व्या मिनाटाला उरुग्वेचा एडिसन्स कवानीने पेनल्टी किकवर गोल केला.
सामना सुरु झाल्यावर काही वेळानंतर कोस्टा रिकाच्या ज्योएल कॅम्पबेलन 54 व्या मिनिटाला गोल करुन उरुग्वे सोबत बरोबरी केली. त्यानंतर 57 व्या कोस्टा रिकाच्या ऑस्कर दुआर्तेने गोल करुन 2-1 वर सामना आणला.
ऑस्कर दुआर्तेचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय खेळातील गोल होता. 84 व्या मिनिटाला मार्कस युरेनने गोल करुन 3-1 अशा फरकानं कोस्टाचा विजय निश्चित केला. कोस्टा आणि उरुग्वे याच्यांमधील सामन्यात कोस्टाचा पहिलाच विजय आहे.

उरुग्वेच्या मॅक्सी परेराला विश्वचषकातलं पहिलं रेड कार्ड दाखवण्यात आलं. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला परेरानं कोस्टा रिकाच्या ज्योएल कॅम्पबेलला चुकीच्या पद्धतीने टॅकल केलं. मॅच रेफ्री फेलिक्स ब्रायच यांनी परेराला थेट रेड कार्ड दाखवलं. यामुळे परेराला इंग्लंडविरुद्ध सामन्यात आता खेळता येणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.