आता मुंबईतही ‘आयबीएल’ची धूम!

इंडियन बॅडमिंटन लीगचा धमाका आता मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. आज आणि उद्या मुंबईत आयबीएलच्या लढती रंगणार आहेत. सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा आणि ली चाँग वेई यासारख्या दिग्गज आणि ग्लॅमरस प्लेअर्सच्या लढतींची पर्वणी मुंबईकरांनासाठी असणार आहे. विशेष म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड सेलिब्रेटीही बॅडमिंटन कोर्टवर हजेरी लावणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 19, 2013, 02:51 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
इंडियन बॅडमिंटन लीगचा धमाका आता मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. आज आणि उद्या मुंबईत आयबीएलच्या लढती रंगणार आहेत. सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा आणि ली चाँग वेई यासारख्या दिग्गज आणि ग्लॅमरस प्लेअर्सच्या लढतींची पर्वणी मुंबईकरांनासाठी असणार आहे. विशेष म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड सेलिब्रेटीही बॅडमिंटन कोर्टवर हजेरी लावणार आहे.
क्रिकेट हा खेळ भारतात धर्म मानला जातो तर क्रिकेटपटू देव आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेट या खेळाचा खरा ब्रँड अॅम्बेसिडर मानला जातो. मात्र, क्रिकेटचा हा देव आता बॅडमिंटनच्या प्रचार आणि प्रसारासाठी बॅडमिंटन कोर्टवर उतरणार आहे. सच्चा मुंबईकर असलेला सचिन इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये मुंबई मास्टर्स टीमला चिअरिंग करताना आपल्याला पहायला मिळणार आहे. यामुळंच मुंबईत प्रथमच होणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या लढतींना एक वेगळच वलय प्राप्त झालंय.
विशेष म्हणजे मुंबई मास्टर्स ही टीमदेखील महान क्रिकेट आणि मुंबईकर असलेल्या सुनिल गावसकर यांच्या मालकीचा आहे. गावसकर यांच्या टीममध्ये ली चाँग वेई हा वर्ल्ड नंबर वन असलेल्या बॅडमिंटनपटूचा समावेश आहे. म्हणूनच मुंबईकरांना खऱ्या अर्थानं बॅडमिंटन लीगची रंगत अनुभवता येणार आहे.
दिल्ली, लखनऊ, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद अशा सहा शहरांमध्ये बॅडमिंटन लीग खेळली जात असून मुंबईत तीन दिवस लढती रंगणार आहेत. मुंबईतील वरळीच्या सरदार पटेल स्टेडियमवर दिग्गज बॅडमिंटनपटू आपल्या खेळाच दर्शन घडवतील.

हैदराबादकडून सायना नेहवाल, दिल्लीकडून ज्वाला गुट्टा, पुण्याकडून अश्विनी पोनप्पा आणि मुंबईकडून वर्ल्ड नंबर ली चाँग वेई खेळणार आहेत. मुंबईत हैदराबाद हॉटशॉट्स विरुद्ध पुणे पिस्टन्स आणि मुंबई मास्टर्स विरुद्ध क्रिश दिल्ली स्मॅशर्स या तगड्या टीम्समध्ये मुकाबले रंगणार आहेत.
हैदराबाद, मुंबई, पुणे आणि दिल्ली या चारही टीम्समध्ये दर्जेदार आणि ग्लॅमरस खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे खेळ आणि ग्लॅमर या दोन्हींच दर्शन मुंबईकरांना या निमित्तानं घडणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.