www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने कोर्टात आपल्या मुलीसाठी धाव घेतली आहे. आपल्या मुलीचा ताबा आपल्याकडे असावा, यासाठी पेसने न्यायालयात धाव घेतली आहे.
लिएंडर पेस आणि रिहा पिल्लई यांच्या मुलीचा ताबा आपल्याकडे कायमचा यावा, याची याचिका पेसने कोर्टात केली आहे. तसेच न्यायालयाची परवानगी मिळाल्यावरच रिहा पिल्लईला आपल्या मुलीला भेटता यावं. याशिवाय रिहाने आपल्या मुलीला भेटू नये. अशी याचिका पेसने कोर्टात केली आहे.
पेसला आपल्या मुलीला गमावण्याची भिती वाटत आहे. तसेच रिहा आपल्या मुलीला त्रास देऊ शकते. कादाचित रिहा आपल्या मुलीला परदेशातही जबरदस्तीने घेऊन जाऊ शकते. असा संशय येत असल्याने पेसने कोर्टात धाव घेतली.
पेस आणि रिहाचे लग्न झाल नाही. पण पेस आणि रिहा हे २००३ पासून एकत्र राहत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.