www.24taas.com, लंडन
भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने लंडन ऑलिम्पिकमध्ये झालेल्या ६६ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये सिल्व्हर मेडल मिळवलंय. फायनलमध्ये त्याला जपानच्या योनेमित्सु तात्सुहिरोकडून ३-१ ने पराभवाचा धक्का पचवावा लागलाय.
लंडन ऑलिम्पिकमधील भारताचं कुस्तीतील हे दुसरं मेडल आहे. याआधी योगेश्वर दत्तने ६० किलो वजनी गटात ब्राँझ मेडलवर कब्जा केला होता. सिल्व्हर मेडल पटकावणाऱ्या सुशीलने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताकरता ब्राँझ मेडलची कमाई केली होती. १९५२ साली खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीतील पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून दिलं होतं.
सुशील कुमारला फायनलमध्ये जरी पराभवाचा धक्का पचवावा लागला असला तरी त्याच्या सिल्व्हर मेडल परफॉर्मन्सने भारतीयांमध्ये उत्साह संचारला आहे. सुशीलने मिळवलेल्या सिल्व्हर मेडलनंतर दिल्ली सरकारने त्याला एक कोटी रूपयांचं बक्षिस जाहीर केलंय तर क्रीडा मंत्री अजय माकन यांनी सुशीलचं अभिनंदन केलंय.