भारताच्या पी. सिंधूने रचला इतिहास

भारताची बॅडमिंटन प्लेअर पी.व्ही.सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारत मेडल निश्चित केल आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल निश्चित करणारी ती पहिली बॅडमिंटपटू ठरली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 9, 2013, 06:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
भारताची बॅडमिंटन प्लेअर पी.व्ही.सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारत मेडल निश्चित केल आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल निश्चित करणारी ती पहिली बॅडमिंटपटू ठरली आहे.
क्वार्टर फायनलमध्ये तिने चीनच्या 8वया सीडेड सिक्सियान वँगला 21-18, 21-17ने सरळ गेमध्ये पराभूत करत सेमी फायनल गाठली. अशी कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
सिंधूनं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली असली तरी सायना नेहवाल आणि पी. कश्यप या दोघांचही वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील आव्हान संपुष्टात आलंय. क्वार्टर फायनलमध्ये दोघांनाही पराभवाला सामोर जाव लागलय.
क्वार्टर फायनलमध्ये सायनाला साऊथ कोरियाच्या यॉन जु बेने 23-21, 21-9ने सरळ गेममध्ये पराभूत केल. तर पी. कश्यपला चीनच्या डु पेंग्युने 21-16, 22-20, 21-15ने पराभवाची चव चाखायला लावली.
सायना आणि कश्यपचं आव्हान संपुष्टात आल्यामुळे आता भारताच्या सा-या आशा पी.व्ही.सिंधूवर एकवटल्या आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.