'सचिन-सेहवागमुळे रोहितला मिळत नव्हती संधी'

गुरुवारी वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशला पराभूत केले. या मॅचचा हिरो ठरला शतकवीर रोहित शर्मा... रोहितने १२६ चेंडूत १३७ रन्सची महत्त्वाची खेळी खेळली. रोहितच्या याच खेळीच्या जोरावर भारताचा विजय सहज झाला.

Updated: Mar 20, 2015, 07:26 PM IST
'सचिन-सेहवागमुळे रोहितला मिळत नव्हती संधी' title=

मेलबर्न : गुरुवारी वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशला पराभूत केले. या मॅचचा हिरो ठरला शतकवीर रोहित शर्मा... रोहितने १२६ चेंडूत १३७ रन्सची महत्त्वाची खेळी खेळली. रोहितच्या याच खेळीच्या जोरावर भारताचा विजय सहज झाला.

या मॅचनंतर पत्रकारांशी बोलताना टीम इंडियाच्या कॅप्टन कूल धोनीनं रोहितची प्रशंसा केलीय. 'चार वर्षांपूर्वी रोहितची क्षमता वाया जात होती... कारण भारतासाठी ओपनिंग करण्यासाठी चांगले खेळाडू आधीपासून उपलब्ध होते. म्हणून रोहितला ओपनिंगला बॅटिंग करण्याची संधीच मिळत नव्हती' असंही यावेळी धोनीनं म्हटलंय. 

धोनीनं रोहितची स्तुती करत अप्रत्यक्षपणे सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्यावर निशाना साधलाय. कारण चार वर्षांपूर्वी सचिन आणि सेहवागच टीम इंडियासाठी ओपनिंग करत होते. 

सचिनने वेळेवर क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला... मात्र, सेहवाग खेळ आणि फिटनेसच्या कारणाने अजूनही टीमच्या बाहेर आहे. सेहवागनं संन्यास घेतला नाही पण त्याची क्रिकेटमध्ये परण्याची शक्यता आता मावळत चाललीय.

याआधीही, अनेकांनी धोनीमुळेच सेहवाग टीमच्या बाहेर असल्याचेही जाहीर आरोप केले आहेत आणि सेहवागने स्वत:ही अप्रत्यक्षपणे का होईना पण अनेकदा ही गोष्ट बोलून दाखवली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.