अॅडलेड : वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्ताचा दारुन पराभव करत पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवलाय. या पराभवामुळे पाकिस्तान टीम वर्ल्डकपमधूनच बाहेर फेकली गेलीय. पण, जाता जाता पाकिस्ताननं एक अजब रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय.
या सामन्यामध्ये पाकिस्तानचे सर्वच्या सर्व म्हणजे दहाही खेळाडू आऊट झालेत. आऊट झालेले सर्व खेळाडू कॅच आऊट होते आणि हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. ही सहावी वेळ आहे जेव्हा एका टीममधील सर्वच्या सर्व खेळाडू कॅच आऊट झालेत. यातील खास गोष्ट अशी आहे की, तब्बल चार वेळा हा रेकॉर्ड वर्ल्डकपमध्ये झालाय. त्यापैंकी, तीन वेळा हा रेकॉर्ड पाकिस्तानच्याच नावावर आहे.
याआधी भारत आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे सर्व खेळाडू कॅच आऊट झाले होते.
अशा प्रकारे सर्वांत जास्त वेळा एका़च टीमचे सर्व खेळाडू कॅच आऊट होण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर नोंदविला गेलाय.
पाकिस्तानव्यतिरिक्त वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध स्कॉटलंडचे सर्व खेळाडू कॅच आऊट झाले आहेत. स्कॉटलंडनं हा कारनामा इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑल आऊट होऊन केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.