www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रेड बुलचा ड्रायव्हर सेबेस्टियन व्हेटेल इंडियन ग्राँप्रीमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय. नोएडाच्या बुद्धा सर्किटवर व्हेटेलने विजेतेपद पटकावलं तर इंडियन ग्राँप्रीमध्ये तो हॅट्रटिक साधेल. याचबरोबर सलग चौथ्यांदा तो वर्ल्ड चॅम्पियनशिपलाही गवसणी घालेल. तर त्याच्या टीमच्याच मार्क वेबरसाठी ही अखेरची एफवन रेस ठरणार आहे.
सेबेस्टियन व्हेटेल या जर्मन ड्रायव्हरची गाडी फॉर्म्युला वनच्या ट्रॅकवर सध्या भन्नाट वेगाने धावतेय. त्याचा हा वेग पाहता तो नोएडातील बुद्ध सर्किट इतिहास रचणार हे नक्की...सध्याचा त्याचा सुपरडुपर फॉर्म पाहता सलग दोनवेळा इंडियन ग्राँप्रीच विजेतेपद पटकावलेला व्हेटेल यंदा हॅटट्रिक साधणार अशीच खात्री त्याचे चाहते व्यक्त करताहेत. एवढच नव्हे तर इंडियन ग्राँप्रीमध्ये तो आपल्या चाहत्यांना डबल ट्रिट देण्यासाठी सज्ज झालाय. इंडियन ग्राँप्रीमध्ये तो हॅटट्रिक तर साधेलच याचबरोबर या विजयासह तो सलग चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपपदाला गवसणी घालणार आहे. या सीझनमध्ये व्हेटलला वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी इंडियन ग्राँप्रीमध्ये केवळ टॉप फायमध्ये येण्याची गरज आहे. मूळचा जर्मनीचा असलेल्या व्हेटेलने ऑस्ट्रेलियाच्या रेड बुल टीमकडून खेळताना या सीझनमध्ये आत्तापर्यंत 9 एफवन रेसेस जिंकल्या आहेत. म्हणूनच त्यानेच इंडियन ग्राँप्री जिंकली तर आश्चर्य वाटायला नको. इंडियन ग्राँप्रीबाबत बोलताना व्हेटेल म्हणतो की, इंडियन ग्राँप्री नेहमीच आमच्यासाठी चांगली ठरली आहे. सीझनच्या अखेरीस इंडियन ग्राँप्रीची ट्रॉफी पुन्हा एकदा उंचवायला आपल्याला आवडेल. मला इंडियन ग्राँप्रीचा ट्रॅक आवडतो आणि भारतात यायलाही आपल्याला आवडतं.
इंडियन ग्राँप्रीमध्ये आपण विजयी होऊ असा विश्वास जरी व्हेटेलला वाटत असला तरी बुद्ध सर्किटचा ट्रॅक सोपा नाही या ट्रॅकवर अनेक कठिण वळण असून ट्रॅकवरील तिसरे उतर असलेले वळण सर्वात कठीण असल्याची कबुली तो देतो. या सीझननंतर एफवनला गुडबाय करणारा व्हेटेलचा टीममेट असलेला मार्क वेबरही भारताबाबत भरभरुन बोलतो.
भारत हा अनेक कारणांमुळे अतिशय आगळा-वेगळा असा देश ठरतो. भारतातील वेगळी संस्कृती, सुंदर आणि गजबजलेली शहर पाहण्यासारखी आहेत. मी काही भारतीय पदार्थांचा स्वादही घेतला असून ते पदार्थ खरच खुप स्वादीष्ट होते. ते पदार्थ मसालेदार असले तरीही आपल्याला काही फरक पडत नाही.
वेबरला मात्र बुद्ध सर्किट हे टर्की आणि सिल्वरस्टोन ट्रॅकसारखा भासतो. कदाचित यंदाची इंडियन ग्राँप्री ही अखेरची रेस ठरण्याची शक्यता आहे. या अखेरच्या इंडियन ग्राँप्रीमध्ये सेबेस्टिन वेटलने इतिहास रचावा हिच व्हेटलच्या चाहत्यांची आणि भारतीयांची इच्छा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.