राज ठाकरे 'किंगमेकर' नव्हे 'किंगफिशर' - आठवले

नाशिकमध्ये राज ठाकरे किंगमेकर नव्हे तर किंगफिशर ठरतील, असा टोला आरपीआय नेते रामदास आठवलेंनी लगावला आहे. आरपीआयचे चार नगरसेवक असून राष्ट्रवादीसह शिवसेना-भाजपनं पाठिंबा दिल्यास पक्षाचा महापौर बनेल असा विश्वास त्यांनी पंढरपूरमधल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Updated: Feb 23, 2012, 05:28 PM IST

www.24taas.com, पंढरपूर

नाशिकमध्ये राज ठाकरे किंगमेकर नव्हे तर किंगफिशर ठरतील, असा टोला आरपीआय नेते रामदास आठवलेंनी लगावला आहे. आरपीआयचे चार नगरसेवक असून राष्ट्रवादीसह शिवसेना-भाजपनं पाठिंबा दिल्यास पक्षाचा महापौर बनेल असा विश्वास त्यांनी पंढरपूरमधल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

निवडणुकीच्या दिवशी राज यांना विचारण्यात आलं होतं की, आपण मुंबईत किंगमेकर ठरू शकाल का? तेव्हा राज ठाकरे यांनी मला किंग व्हायचं आहे. किंगमेकर नाही. असं वक्तव्य केल्याने मनसेने निवडणुकीत नक्की किती जागा मिळविणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण महायुतीने निर्विवादपणे मॅजिक फिगर गाठल्याने मुंबईत राज ठाकरे किंगमेकरही बनता आलं नाही.

तर नाशिकमध्येही त्यांचा पक्ष हा मोठा असला तरी त्यांना एकहाती सत्ता मिळविण्यात यश मिळालं नसल्याने रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या किंगमेकर आणि किंग या वक्तव्याची खिल्ली उडवली. तसचं मुंबई महापालिकेचा महापौर मनसे नाही तर आरपीआय ठरवेल असं वक्तव्य करणाऱ्या रामदास आठवले यांच्या पक्षाचा फक्त एकच उमेदवार हा मुंबईत निवडून आला आहे. त्यामुळे आता रामदास आठवलेंच्या टीकेवर राज नक्की काय उत्तर देणार?