सोन्याचा 'सम्राट' पण वांजळेंचा रिपीट टेलिकास्ट

दिवंगत मनसे आमदार रमेश वांजळे आजही लोकांच्या स्मरणात आहेत ते त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या हौसेमुळे. पुण्याचे गोल्डन मॅन अशीच ओळख त्यांनी निर्माण केली होती. पण आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुण्यात आणखी एक गोल्डन मॅन नावारुपाला येऊ पाहतो आहे.

Updated: Jan 15, 2012, 10:51 PM IST

www.24taas.com, पुणे

दिवंगत मनसे आमदार रमेश वांजळे आजही लोकांच्या स्मरणात आहेत ते त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या हौसेमुळे. पुण्याचे गोल्डन मॅन अशीच ओळख त्यांनी निर्माण केली होती. पण आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुण्यात आणखी एक गोल्डन मॅन नावारुपाला येऊ पाहतो आहे.

गळ्यात आणि हातात  सोन्याचे भरगच्च दागिने आपल्याला मनसे आमदार रमेश वांजळेंची आठवण यांची आठवण देते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सम्राट मोझे हा देखील असाच सोन्याने मढलेला आहे. पुण्यात संगमवाडीत राहणाऱ्या सम्राटला महानगरपालिका निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण त्याच्या या हौसेमुळे तो रमेश वांजळेंची नक्कल करत असल्याचं बोललं जातं आहे. मात्र सम्राट हे नाकारतो आहे.

सम्राटला घरातून बाहेर पडण्यासाठी तयारी करताना सोन्याचे दागिने घालायलाच तब्बल २० मिनिटं लागतात. सोन्याच्या दागिन्यांमुळे मनसे आमदार रमेश वांजळे यांना लोकप्रियता मिळाली. तशीच लोकप्रियता सम्राटलाही अपेक्षित आहे. पण केवळ एका हौसेची नक्कल केल्यानं वांजळेंएवढी लोकप्रियता मिळणं तसं कठीणच आहे...