www.24taas.com, झी मीडिया, सांगली
कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या दुसऱ्या लवादानं आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मान्यता दिलीय. याच लवादनं २०१०ला आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ती ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास कर्नाटकाला परवानगी दिली होती. तो निर्णय लवादनं पुन्हा उचलून धरलाय.
धरणाची उंची वाढविल्यास, महापूराच्या काळात महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसतो. त्याचा अनुभव २००५मध्ये आलाय. त्यामुळं महाराष्ट्राबरोबरच आंध्रप्रदेश या दोन राज्यांचा उंची वाढवण्यास विरोध आहे.
त्यामुळं लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र कोणती भूमिका घेतं याकडं पूरपट्यातील सर्व लोकांचं लक्ष लागलंय. येत्या अधिवेशनात हा मुद्दा लोकसभेत मांडणार आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.