www.24taas.com, झी मीडिया, बारामती
शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
ज्यांना ऊस पेरतात की त्याचं बेणं दाबतात याची तिळमात्र माहिती नाही, त्या माधव भंडारी सारख्या लोकांनी ऊस दराच्या बाबतीत टिव्ही समोर बसून गप्पा मारू नयेत, असंही अजित पवार म्हणालेत. बारामती तालुक्यातील मेडद इथल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते.
दिवसेंदिवस साखर कारखान्यांना उसाच्या दरासाठी वेठीस धरले जात आहे. त्यामुळं राज्यातले अनेक सहकारी कारखाने शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचे बळी ठरून अडचणीत आले आहेत. असा सूरही त्यांनी लावला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.