मिळून खाणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांवर गुन्हा दाखल

बीडमधली जिल्हा मध्यवर्ती बँक गैरव्यवहार प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांविरोधात अखेर गुन्हे दाखल झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 3, 2013, 10:32 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीड
बीडमधली जिल्हा मध्यवर्ती बँक गैरव्यवहार प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांविरोधात अखेर गुन्हे दाखल झालेत.
खासदार रजनी पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. या सगळ्यांवर स्वतःच्या ताब्यात असणाऱ्या संस्थांसाठी मध्यवर्ती बँकेतून बेकायदेशीर कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या संस्थांकडे कोट्यवधींचं कर्ज थकित असताना नव्यानं कर्जाचं वाटप केल्या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेभाऊ मुंडे यांच्यासह 24 संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.
2008 मध्ये ‘आदित्य’ बहुउद्देशीय संस्था बीड, श्रीमती मल्लवाबाई वल्याळ डेंटल कॉलेज सोलापूर, व्यंकटेश्वर अँग्रो प्रोडक्ट्स, जय भवानी सहकारी साखर कारखाना, खंड औद्योगfक बहुउद्देशीय संस्था आणि गजानन सहकारी साखर कारखाना या सर्व संस्थेला मिळून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून 35 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज तत्कालीन संचालकांनी मंजूर केले होते. मात्र, हे कर्जमुदतीत बँकेत भरले गेले नाहीत.

बँकेच्या अधिकाऱ्यांनी सदर कर्जांच्या कागदपत्रांची खातरजमा केली असता हे सर्व कर्ज विनातारण आणि बोगस कागदपत्रांच्या आधारावर देण्यात आल्याचं उघड झालं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.