मराठी सांस्कृतिक कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात कलाकेंद्राच्या नावाखाली डान्स बार आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरुन पोलीसांनी छापा टाकला. कल्याण-विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावर पायल मराठी सांस्कृतिक कलाकेंद्र आहे,

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 18, 2012, 11:13 PM IST

www.24taas.com, अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात कलाकेंद्राच्या नावाखाली डान्स बार आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरुन पोलीसांनी छापा टाकला. कल्याण-विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावर पायल मराठी सांस्कृतिक कलाकेंद्र आहे, या कलाकेंद्राच्या नावाखाली मुंबई इथल्या बारबाला दलाला मार्फत आणून डान्स बार सुरु असल्याची गुप्त माहिती पाथर्डी पोलिसांना मिळाली होती,त्यावरुन हा छापा टाकण्यत आला.
या छाप्यात 8 बारबाला आणि 13 ग्राहकांना पोलिसांनी गजाआड केलय आणि त्यांच्यावर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आलीये.ज्या आठ बारबालांना अटक केली आहे.या बरबालांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश असून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे समोर आलय.
डान्सबारला पोलिसांकडूनच छुपा पाठिंबा मिळत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये यामुळेल एकच खळबळ उडालीये.