…आणि चोरीला गेलेलं बाळ परत मिळालं!

पुण्यामधून चोरीला गेलेलं बाळ परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. हिंजवडी पोलिसांनी थेरगावमध्ये राहणाऱ्या एका महिलेकडून हे बाळ परत मिळवलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 9, 2013, 11:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यामधून चोरीला गेलेलं बाळ परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. हिंजवडी पोलिसांनी थेरगावमध्ये राहणाऱ्या एका महिलेकडून हे बाळ परत मिळवलंय.

स्वाती गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. मूल होत नाही, म्हणून तीनं ससून हॉस्पिटलमधून बाळ चोरलं होतं. ससूनमध्ये वैशाली माने ही महिला प्रसूत झाली होती. सामाजिक कार्यकर्ता असल्याचं सांगत स्वाती गायकवाडनं वैशाली मानेशी ओळख वाढवली. सहा सात दिवस बाळाची काळजी घेतली... सहा तारखेला वैशाली माने या मुलाला घेवून त्यांच्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी स्वातीनं मुलाला डायपर आणते, असं सांगत मुलाला घेऊन हॉस्पीटलमधून पळ काढला.
हिंजवडी पोलीस पॅट्रोलिंग करत असताना त्यांना थेरगावमध्ये एका महिलेकडे बाळ असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्वाती गायकवाडला अटक करण्यात आली... आणि या बाळाला आपल्या आईकडे सुखरुप सुपूर्द केलं गेलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.