मुख्याध्यापिकेचा तोरा... चौकशी अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की!

सिल्व्हर ओक शाळेत आज मुख्याध्यापिकेनं मुजोरीचा कळस गाठला. फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना उन्हात उभं करणाऱ्या या शाळेची चौकशी करण्यासाठी शिक्षणाधिकारी आज या शाळेत गेले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 9, 2013, 10:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
सिल्व्हर ओक शाळेत आज मुख्याध्यापिकेनं मुजोरीचा कळस गाठला. फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना उन्हात उभं करणाऱ्या या शाळेची चौकशी करण्यासाठी शिक्षणाधिकारी आज या शाळेत गेले. त्यावेळी मुख्याध्यापिकेनं चक्क शिक्षणाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत त्यांना हाकलून लावलं.
सिल्व्हर ओक शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा सारथी यांचा तोरा आज शिक्षणाधिकाऱ्यांसमोर आणि मीडियासमोरही उघडपणे समोर आला. शिक्षणाधिकारी वसुधा कुर्नावळकर यांना तर या प्रकारानं धक्काच बसला. मुख्याध्यापक पदावर बसणाऱ्या या महिलेची मुजोरी एव्हढी की शिक्षणाधिकाऱ्यांना फक्त गेट आऊट म्हणून त्या थांबल्या नाहीत तर त्यांना चक्क शाळेतून हाकलून लावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सिल्व्हर ओक शाळेत फी न भरलेल्या मुलांना गेल्या आठवड्यात तब्बल पाच तास उन्हात उभं करण्यात आलं होतं. याचीच चौकशी करण्यासाठी शिक्षणाधिकारी सिल्हर ओक शाळेत गेले होते. सुरुवातीला मुख्याध्यापिका शाळेत नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. पण मॅडम केबिनमध्येच असल्याचं कळताच शिक्षणाधिकाऱ्यांनी केबिन गाठली. त्याचवेळी मुख्याध्यापिकेनं त्यांना चक्क हाकलून लावलं.
विद्यार्थ्यांना २४ तासाच्या आत वर्गात बसू देण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, त्यालाही केराची टोपली दाखविण्यात आली. आता या शाळेची मान्यता रद्द करण्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्याची तयारी शिक्षणाधिकाऱ्यांनी सुरु केलीय.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.