पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील चक्कर येऊन स्टेजवर कोसळले. शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कात्रज येथे कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली
कार्यक्रम सुरु असताना वळसे पाटील यांना सौम्य हृद्यविकाराचा झटका आल्याने ते व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ भारती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.