www.24taas.com, झी मीडिया, पुणे
सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तीन मजूरांचा मृत्यू झालाय तर सात मजूर गंभीर जखमी झालेत. हा अपघाता सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. क्रॉसिंगवर मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला एक्स्प्रेसने धडक दिली.
हैदराबादहून मुंबईकडे जात असलेल्या दुरांतो ही गाडी जात होती. दौंडमधील खामगाव फाट्यानजीक सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस ही गाडी आली असताना ट्रॅक्टरला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात ऊस तोडणी कामगारांचा समावेश आहे.
यवतजवळील खामगाव फाटा येथे असलेल्या क्रॉसिंगवर रुळावरून जात असलेल्या ट्रॅक्टरला दुरांतोने धडक दिली. यावेळी ट्रॅक्टरमध्ये 20 ऊसतोडणी कामगार जात होते. धडकेनंतर तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर, पंधरा जण जखमी असून त्यांच्यावर दौंडमधील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.
गाडी जाणार होती याची माहिती असूनही, क्रॉसिंगवरील गेट उघडे ठेवल्याची बाब पुढे आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
यवत येथील अपघातील मृतांची नावे
1. कारभारी खिरोबा महार्नवर (50)
2. इंदूबाई भागिनाथ हंडाळे (40) दोघंही राहणार तांबेवाडी, पाथर्डी, जि. अहमदनकर
3. ताई नामदेव बरडे (55) रा. मंचरवाडी, पाथर्डी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.