आठ वर्षांच्या चिमुरडीनं वाचविले ४ वर्षांच्या मुलीचे प्राण

इंदापूर जिल्ह्याच्या लासुर्णे इथं एक शौर्याची घटना घडली. एका आठ वर्षाच्या चिमुरडीनं चार वर्षाच्या चिमुकलीचे प्राण वाचवले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 2, 2014, 07:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, इंदापूर
इंदापूर जिल्ह्याच्या लासुर्णे इथं एक शौर्याची घटना घडली. एका आठ वर्षाच्या चिमुरडीनं चार वर्षाच्या चिमुकलीचे प्राण वाचवले.
अक्षता हनुमंत वाघमारे (वय ८) आणि पूजा अहिवळे (वय ८) आणि पूजाची चार वर्षाची धाकटी बहिण गौरी लासुर्णे परिसरातल्या आठदारे इथं कालव्याजवळ थांबल्या होत्या. तेव्हा कालव्याच्या वितरिकेमधून जवळपास तीन फूट पाणी वाहत होतं. तेव्हा गौरी अचानक वितरिकेमध्ये पाय घसरून पडली आणि जीव वाचविण्यासाठी दीदी... दीदी...अशा हाका मारू लागली.
अक्षता आणि पूजा या दोघींना ती दीदी नावानंच बोलावीत असल्यानं अक्षता न घाबरता त्वरित वितरिकेमध्ये उतरली. तिच्या गळ्यापर्यंत पाण्याची पातळी होती. या दरम्यान गौरी पाण्यामध्ये बुडू लागली होती आणि प्रवाहाबरोबर हळूहळू पुढं वाहत चालली होती. अक्षता हिनं तिला धरून बाहेर काढलं आणि सायंकाळी घरातील नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला. अक्षता हिच्या धाडसाचं लासुर्णे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.