कोकण साहित्य संमेलनात वाद नाही - कोतापल्ले

कोकणात चिपळूण इथं होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात कोणताही वाद अथवा राजकीय हस्तक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलाय

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 25, 2012, 04:14 PM IST

www,24taas.com,कराड
कोकणात चिपळूण इथं होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात कोणताही वाद अथवा राजकीय हस्तक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलाय.
कराडमध्ये अंकुर साहित्यसंमेलनाच्या उदघाटनप्रसंगी नागनाथ कोतापल्ले बोलत होते. संमेलनाच्या व्यासपीठावर जर राजकीय चर्चा झाली तरच संमेलनाला राजकीय स्वरूप आलं असं म्हणता येईल. मात्र यामुळेच राजकीय व्यक्तींना संमेलनात येऊ द्यायचं नाही अशा प्रकारचं धोरण बरोबर नाही असंही कोतापल्ले यांनी म्हंटलय.
दरम्यान, ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला लागलेलं ग्रहण सुटण्याची काही चिन्ह दिसत नाहीएत. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी तटकरेंच्या नावाचं समर्थन केलंय.
येत्या जानेवारीत ८६वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय. शरद पवार या संमेलनाचे उदघाटक आहेत. तर समारोपाला अजित पवारांना आमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे हे संमेलन राष्ट्रवादीनं हायजॅक केल्याचा आरोप आधीपासूनच होत होता. त्यातच आता सुनील तटकरेंची स्वागताध्यक्ष म्हणून निवड झालीय. तटकरेंवर सिंचन घोटाळ्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं शिवसेनेनं तटकरेंना विरोध दर्शवलाय.