गाडगीळ अहवालामुळे कोकणचा विकास ठप्प होईल - मुख्यमंत्री

कोकणाचा विकास होण्यासाठी आणि काय विकास केला जावा यासाठी माधव गाडगाळ समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या माधव गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारल्यास कोकणचा विकास ठप्प होईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 25, 2012, 03:57 PM IST

www,24taas.com,मुंबई
कोकणाचा विकास होण्यासाठी आणि काय विकास केला जावा यासाठी माधव गाडगाळ समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या माधव गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारल्यास कोकणचा विकास ठप्प होईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
रस्ते, रेल्वे, बंदरं, विमानतळ, उद्योग अशी कुठलीच कामं कोकणात होऊ शकणार नाहीत. सरकारनं आपलं हे मत कस्तुरीरंजन समितीसमोर मांडलं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
पश्चिम घाट संवर्धनासंदर्भात माधव गाडगीळ समितीनं शिफारशी केल्या आहेत. मात्र या शिफारशी लागू केल्यास कोकणातील खाणी, विद्युत प्रकल्प तसेच येऊ घातलेल्या उद्योगांवर परिणाम होणार असल्याचं सांगत कोकणातल्या राजकीय नेत्यांनीही गाडगीळ समितीच्या शिफारसींना विरोध केलाय.