www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापुरातील टोल वसुली पुन्हा सुरू होणार आहे, कारण कोल्हापूर परिसरातील "आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर` या कंपनीच्या नऊ नाक्यांवरील टोलवसुली पुन्हा सुरू करून या नाक्यांना पोलिस संरक्षण द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिलाय.
मुंबई उच्च न्यायालयाचा टोलवसुली बंद करण्याचा आदेश सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने रद्दबातल ठरविला.
कोल्हापुरातील टोलविरोधी कृती समितीने या कंपनीच्या टोल वसुलीविरोधात याचिका दाखल केली होती.
सरन्यायाधीश लोढा यांच्या नेतृत्वाखालील पीठात न्यायमूर्ती जोसेफ कुरियन आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करून टोलवसुली पोलिस संरक्षणात पुन्हा सुरू करण्याचा निकाल दिला.
या प्रकरणात कंपनीतर्फे ऍड. फली नरिमन, ऍड. शिवाजी जाधव आणि श्याम दिवाण यांनी, तर टोलविरोधी समितीतर्फे ऍड. शेखर दिवाण यांनी आणि कोल्हापूर महापालिकेतर्फे ऍड. कामा यांनी काम पाहिले.
कोल्हापूर परिसरातील रस्त्यांचे काम करणाऱ्या "आयआरबी` या कंपनीविरुद्ध टोलविरोधी कृती समितीची ही लढाई सुमारे अडीच वर्षांपासून सुरू आहे.
या कंपनीने कोल्हापूर परिसरातील रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचे सांगून डिसेंबर 2011 पासून या नऊ टोलनाक्यांवर वसुली सुरू केली होती. मात्र, स्थानिक जनतेत त्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटली. टोलविरोधी कृती समितीने या टोलवसुलीविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कोल्हापूर महापालिकेनेही रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचा कंपनीचा दावा अमान्य केला होता. टोलविरोधी समितीचा युक्तिवाद मा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.