www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
शाळा, कॉलेज परिसरात रोड रोमीयोंकडून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार ही नित्याचीच बाब झाली आहे. पोलिसांकडून जुजबी कारवाई केली जाते आणि पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’. कोल्हापूरातही अशाच तक्रारी वाढल्या होत्या. शाळकरी मुली आणि तरुणींनी रोड रोमीयोंची धास्ती घेतली होती खरी, पण आता रो़ड रोमियोंनीच धसका घेतला...
रुपेरी पडद्यावरचा ‘सिंघम’ तुम्ही बघीतला असेल. पण वास्तवातही असेही काही पोलीस अधिकारी असल्याचं बुधवारी कोल्हापूरकरांना पहायला मिळालं. दुपारच्यावेळी कोल्हापूरच्य़ा प्रमुख शाळा क़ॉलेज परिसरात पंजाबी ड्रेज परिधान केलेली एक महिला दाखल झाली...आणि तिने तिथं उभ्या असलेल्या तरुणांची चौकशी सुरु केली. त्यांचे ओळखपत्र तपासले. हा काय प्रकार आहे हे त्या तरुणांना सुरुवातीला समजलं नाही मात्र काही वेळातच त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं. कारण त्यांची चौकशी करणा-या दुस-या तिस-या कोणी नव्हत्या तर त्या होत्या कोल्हापूरच्य़ा अतिरिक्त पोलीस अधिक्षक ज्य़ोतिप्रिया सिंह. शाळा आणि कॉलेज परिसरात छेडछाडीचे प्रकार वाढल्यामुळे रोड रोमियोंना धडा शिकवण्यासाठी खुद्द ज्योतिप्रिया सिंह रस्त्य़ावर उतरल्या होत्या. त्यांना पाहून रोड रोमियोंची एकच भांबेरी उडाली.
वाट दिसेल तिकडं हे रोड रोमियो पळत सुटले..पण ज्योतिप्रिया सिंह यांच्या सोबत असलेल्या पथकाच्या तावडीतून ते सुटु शकले नाहीत. रोड रोमियांना आपण आल्याची कुणकुण लागू नये म्हणून ज्योतिप्रिया सिंह या मोटर सायकलवरुन आल्या होत्या.तसेच मोटर सायकल चालवण्यासाठी पोलीस उपाधिक्षक वैशाली माने यांना त्यांनी सोबत घेतलं होतं. त्यामुळे रोड रोमियोंना त्यांची खबर लागली नाही.
या कारवाईत काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. कोल्हापूरात एका महिला पोलीस अधिका-याने अशा प्रकारे पहिल्यांद कारवाई केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.