www.24taas.com, झी मीडिया,पुणे
पुण्यातील नयना पुजारी हत्या प्रकरणात एक नवा खुलासा झालाय. वकिलांनी सल्ला दिल्यानंतर जेलमधून पळाल्याची कबुली हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊतनं दिलीय.
पळून जाण्यासाठी पोलीस आणि जेलमधील डॉक्टरांना लाच देऊन पळाल्याचं योगेश राऊतनं सांगितलंय. २००९ साली पुण्यातल्या नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी योगेश राऊतला गुन्हे शाखेने नगर जिल्ह्यातून अटक केली होती.
नयना एक सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. ७ ऑक्टोबर २००९ ला चार नराधमांनी नयनावर पाशवी बलात्कार करून अतिशय निघृण पद्धतीने तिचा खून केला. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं त्यांनी तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर नयनावर बलात्कार करून तिची हत्या केली.
महेश ठाकूर, योगेश राऊत, राजू चौधरी आणि विश्वास कदम या चौघांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली. मात्र योगेश राऊत हा आरोपी १८ सप्टेंबर २०११ रोजी पोलिसांच्या अटकेत असतानाच पुण्याच्या ससून रूग्णालयातून पळाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.