आदिवासींमध्ये बलात्काराची संकल्पनाच नाही- राणी बंग

‘आदिवासी कधीही बलात्कार करत नाहीत’, असं वक्तव्य समाजसेविका राणी बंग यांनी केलं आहे. शांतीनिकेतन लोकविद्यापीठातर्फे भावनिक एकात्मता आणि कर्मयोगिनी पुरस्काराने राणी बंग यांना सन्मानित करण्यात आला. याप्रसंगी राणी बंग यांनी आपल्या भाषणात हे उद्गार काढले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 21, 2013, 06:10 PM IST

www.24taas.com, सांगली
‘आदिवासी कधीही बलात्कार करत नाहीत’, असं वक्तव्य समाजसेविका राणी बंग यांनी केलं आहे. शांतीनिकेतन लोकविद्यापीठातर्फे भावनिक एकात्मता आणि कर्मयोगिनी पुरस्काराने राणी बंग यांना सन्मानित करण्यात आला. याप्रसंगी राणी बंग यांनी आपल्या भाषणात हे उद्गार काढले.
आदिवासी कधीही चोऱ्या करत नाहीत. तसंच ते कधीही बलात्कार करत नाहीत. आदिवासी समाजात कधीच बलात्कार होत नाहीत. हे लोक खऱ्या अर्थाने सहजीवनाची मूल्यं जपतात. असं राणी बंग यांनी आपल्या भाषणात म्हटलं. आदिवासी मानवांशीच नव्हे, तर निसर्ग, वन्यजीवन यांच्याशी इमान राखतात. आदिवासी नाती जपतात. त्यांनी आपल्याकडून शिकण्यापेक्षा आपणच त्यांच्याकडून जास्त शिकण्याची गरज आहे. असं मत राणी बंग यांनी मांडलं.
मागासलेला समजल्या जाणाऱ्या आदिवासी समाजात बलात्कार होत नाहीत, मात्र तथाकथित सुधारित आणि सुसंस्कृत समाजात बलात्कारांची संख्या वाढत आहे. अशावेळी राणी बंग यांचं विधान हे नक्कीच विचार करण्यासारखं आहे. या समारंभात राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटीलही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राणी बंग यांना सन्मानित केलं.