www.24taas.com,रत्नागिरी
कोकणचा राजा अशी हापूस आंब्याची ओळख. आपल्या मधुर चवीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हापूसवर आता प्रक्रिया होणार असून हापूस आंब्यापासून वाईन तयार होणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठानं हापूस आंब्यापासून वाईन तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केलाय. कच्च्या आणि पिकलेल्या आंब्यापासून ही वाईन तयार करण्यात आलीये. ही वाईन अधिक चांगल्या प्रतिची कशी होईल यावर शास्त्रज्ञ भर देतायेत. हापूसची वाईन तयार करण्यात यश आल्यानं आंबा बागायतदारांसाठी उत्पन्नाचं आणखी आणखी एक साधन मिळालय.
अवेळी गळून पडलेला कच्चा आंबाही आता फुकट जाणार नाही. शिवाय बाजारपेठेत जादा हापूसची आवक झाल्यानंतर भाव कोसळल्यानं आंबा उत्पादकांना जो फटका बसतो. तो फटकाही आता बसणार नाही. कारण जादा उत्पादीत आंबा वाईनरीकडे पाठवता येणार आहे. वाईन निर्मितीच्या या प्रयोगामुळं हापूस आंब्याला नवी ओळख मिळणार.