समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक

फरार म्हणून घोषित असणारा समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवारला पुण्यातून ताब्यात घेतण्यात आलंय. उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Updated: Dec 28, 2015, 05:33 PM IST
समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक title=

उस्मानाबाद : फरार म्हणून घोषित असणारा समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवारला पुण्यातून ताब्यात घेतण्यात आलंय. उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केलीय.

उस्मानाबाद जिल्हयातल्या मुरूम पोलिसांनी ३५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मोतेवारला फरार घोषित केले होते. न्यायालयाच्या आदेशावरून मोतेवारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

डेअरी प्रकल्पमध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून ३५ लाख रूपयांना फसवल्याप्रकरणी २०१२ मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने मोतेवारविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.