www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातली जागा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. यासाठील पुण्यात `स्टार` प्रचारक उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची एक सभा पुण्यात होणार आहे.
प्रचाराची सांगता त्यांच्या सभेने व्हावी यासाठी पक्षाकडून सध्या मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी तीन सभा दिल्या आहेत. त्यातील एक सभा नदीपात्राच्या मैदानात होणार आहे.
शिरोळे यांच्या प्रचारासाठी खासदार नवज्योतसिंग सिद्धू, तसेच पक्षाचे प्रवक्ते मुक्तार अब्बास नकवी, स्मृती इराणी यांच्या सभा पुण्यात होणार आहेत. तसेच १० एप्रिलनंतर गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्याही सभांचे आयोजन पुण्यात होणार आहे.
रामदेव बाबा यांनीही शिरोळे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेला येण्याचे मान्य केले असल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा पुण्यात व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, दुसरीकडे आरपीआयचे नेते रामदास आठवले हे पुण्यात तीन सभा घेणार आहेत.
राज ठाकरे 31 मार्च रोजी पुण्यात येऊन विरोधकांचा समाचार घेणार आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांची जाहीर सभा नदीपात्रात होणार आहे.
पुण्यात याच दिवशी आणखी दोन सभा होणार आहेत, ही ठिकाणं लवकरच जाहीर केली जाणार आहेत. शर्मिला ठाकरेही पुण्यात प्रचाराला येणार आहेत, शर्मिला ठाकरेंचा रोड शो देखिल आयोजित करण्यात आला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.