www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात ९ फेब्रुवारीला होणारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा अडचणीत आली आहे. पोलिसांनी अलका चौकात सभा घेण्याची परवानगी नाकारल्यानंतर मनसेनं एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा घेण्याचा प्रयत्न चालवलाय. मात्र एसपी कॉलेजही गेल्या काही दिवसांपासून परवानगी देण्यास कचरत आहे.
यापूर्वी जे बोलायचं ते ९ तारखेला बोलेन असं म्हणत राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेची उत्सुकता वाढवलीय. मात्र अजूनही सभेसाठी जागा शोधण्यासाठी मनसेची धावाधाव सुरू आहे.
पुण्यात राजकीय पक्षांच्या सभा मुठा नदीच्या पात्रात होतात. पण सध्या तिथं मनोरंजन नगरी उभारण्यात आलीय. तिचा मुक्काम महिना-दीड महिना तरी हलणार नाही. सभेसाठी दुसरा ऑप्शन म्हणजे अलका टॉकीज चौक असं होतं. पण या चौकात गेल्या कित्येक वर्षात राजकीय सभा झालेली नाही. या चौकातल्या सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आता एसपी कॉलेज प्रशासनानंही सभेसाठी मैदान देण्यास नकार दिल्यानं सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.