पिंपरी-चिंचवडमध्ये ८ वर्षीय मुलीवर बलात्कार

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा ८ वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली आहे. भोसरीमध्ये खंडोबा माळ इथं राहणा-या रामप्रकाश यादव या नराधामानं हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी पीडित मुलीचे कुटुंबीय करत आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 18, 2013, 08:15 PM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा ८ वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली आहे. भोसरीमध्ये खंडोबा माळ इथं राहणा-या रामप्रकाश यादव या नराधामानं हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी पीडित मुलीचे कुटुंबीय करत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भोसरीतल्या खंडोबा माळ परिसरात राहाणा-या 8 वर्षीय चिमुरडीवर 20 वर्षीय रामप्रकाश यादव तरुणानं बलात्कार केला. पीडित चिमुरडी या नराधमाच्या घराजवळ खेळत असताना त्यानं तिला चॉकलेट आणि खाऊ देण्याचं आमिष दाखवून खोलीत नेलं. तिथं चिमुरडीचं तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती कोणाला दिली तर जीवे मारण्याची धमकीही त्यानं मुलीला दिली. प्रचंड त्रास होऊ लागल्यानं चिमुरडीनं आईला हा प्रकार सांगितला आणि नराधमाचं कृत्य समोर आलं. बलात्कारानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर पुण्यातून अटक केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये चिमुरडीवर अत्याचार होण्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. कासारवाडीमध्ये एका ९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तिचा आरोपी अद्याप सापडलेला नाही. मुंबईप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये बलात्काराच्या घटना वाढत असल्यानं पोलिसांबरोबरच समाजानंही जागरुक राहणं गरजेचं आहे.