पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन

शिवशक्ती संगमाच्या निमित्तानं आज पिंपरीतल्या मारुंजीच्या मैदानात दीड लाख स्वयंसेवकांनी हजेरी लावली.

Updated: Jan 3, 2016, 08:26 PM IST
पिंपरीत संघ कार्याचं विराट दर्शन title=

पिंपरी : शिवशक्ती संगमाच्या निमित्तानं आज पिंपरीतल्या मारुंजीच्या मैदानात दीड लाख स्वयंसेवकांनी हजेरी लावली. साऱ्या जगात धर्माच्या आधारावर संकुचित विचार करणारी संघटना अशी प्रतिमा बदलण्याच्या उद्देशानं या संगमाचं आयोजन करण्यात आलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी केलेल्या भाषणात, समतेच्या आधारावर निरलस सेवा करणाऱ्यासाठी आज देशात असणारी एकमेव संघटना म्हणून संघाची ओळख बनल्याचं म्हटलंय.

डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या निमित्तानं संघ आणि समता यांचा किती घनिष्ठ संबंध आहे याचा उहापोह भागवतांनी केला. या कार्यक्रमासाठी संघ दृष्टा पश्चिम महाराष्ट्र प्रांतातून जवळपास दीड लाख स्वयंसेवक उपस्थित होते. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री राम शिंदे, असे मंत्री उपस्थित होते.  शिव, आणि शक्ती यांचा एकमेकांशी असणारा संबंध यावेळी भागवतांनी विशद केला.