www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सासवडमध्ये पार पाडला. उद्धघाटनाच्या कार्यक्रमात झालेली चूक समारोपाच्या कार्यक्रमात आयोजकांनी सुधारली.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करणारा ठराव समारोपाच्या वेळी संमत करण्यात आला. तसंच संमेलनाध्यक्ष फ. मु. शिंदेंनीही आपल्या भाषणात दाभोलकरांचा उल्लेख केला.
शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि वनमंत्री पतंगराव कदम या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसंच संमेलानाध्यक्ष फ. मु. शिंदेंसह द. मा.मिरासदार आणि आनंद यादव हे ज्येष्ठ साहित्यिक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.