कोल्हापुरात सिरियल किलरची दहशत

कोल्हापुरात हत्येचं सत्र सुरुच आहे. रेल्वे स्टेशन परिसरात आणखी एका अज्ञाताचा मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट माजलीय. दगडाने ठेचून या इसमाची हत्या करण्यात आलीय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 15, 2013, 11:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापुरात हत्येचं सत्र सुरुच आहे. रेल्वे स्टेशन परिसरात आणखी एका अज्ञाताचा मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट माजलीय. दगडाने ठेचून या इसमाची हत्या करण्यात आलीय. गेल्या ३ महिन्यातील ही अशी नववी हत्या असल्याने या हत्येमागे सीरियल किलर असल्याचा संशय बळावलाय. शाहुपुरी भागातील ही घटना आहे.
कोल्हापूरात खुनाचं सत्र काही संपताना दिसत नाही. आजही रेल्वे स्टेशन परीसरामध्येएका अज्ञाताच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय. अशा प्रकारची महिन्यातील तिसरी घटना असून तीन महिन्यातील नववी घटना आहे.
या हत्येपाठीमागे सिरीयल किलरचा हात असण्याची शक्यता वर्तवली जातीय.पोलीसांना मात्र या किलरला रोखण्यात अपयश येतय. त्यामुळं शहर वासीयामधून संताप व्यक्त करण्यात येतोय.
कोल्हापूरपुरातील रेल्वे स्टेशन समोर फुटपाथवर झोपलेल्या एका अज्ञाताची हत्या होवुन दोन दिवस उलटले नाहीत, तो पर्यत आज याच परीसरामध्ये पुन्हा एकाचा दगडानं ठेचुन खून करण्यात आलाय. पोलीसांनी या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळाची पहाणी केली. खुन्याचा तपास करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केलं. पण त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही.
पोलीसांनी या घटनेबाबत पठडीतल तपास सुरु असल्याचं उत्तर दिलय. पण सलग खून करणारा कोण याचं उत्तर मात्र त्यांच्याकडं नाही.
कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे शाहुपुरी पोलीस स्टेशन पासुन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तरीही या घटनेबाबत शाहुपुरी पोलीसांना काहीच धागेदोरे लागत नाही,याबद्दल आश्चर्य व्यक्त केल जातय.तीन महिन्यामध्ये अशा प्रकारच्या नऊ घटना घडल्यात..या पाठीमागं नक्कीच सिरीयल किलरचा हात असावा अशी शक्यता वर्तवली जातेय.
फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना वारंवार घडत असल्यामुळं नागरीक भयभीत झालेत. पोलीसांना या सिरीयल किलरला जेरबंद का यश येत नाही असा सवाल नागरीक विचारतायत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.