www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र सरकारचा अजून एक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रं या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची चुकीची राजमुद्रा छापण्यात आलीय. हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलंय.
एकीकडे अरबी समुद्रात महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचं स्वप्न पाहाणारं सरकार महाराजांची योग्य राजमुद्राही छापू शकत नाही..
सरकारच्या पुराभिलेख संचालनालयाने प्रकाशित केलेल्या `छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रं` या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २०१२ साली झालं. गेल्या वर्षांपासून या पुस्तकाची प्रत उपलब्ध नव्हती. पण आता हे पुस्तक वाचकाच्या हाती पडल्यावर त्याला पुस्तकातली पहिली चूक पाहायला मिळत्ये. शिवाजी महाराजांची मुद्राच इथे चुकीची छापण्यात आलीय.
इतिहासाचा ढांडोळा घ्यायचा असेल तर अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त असं हे पुस्तक असणं अपेक्षित आहे. पण त्यात मूळ दस्तावेजांनाच धक्का पोहोचवण्यात आलाय. चुकीची मुद्रा छापण्यात आलीच आहे पण त्याचबरोबर पत्रांना डिझाईन करण्याच्या प्रयत्नात मूळ मजकुरालाच काही ठिकाणी धक्का पोहोचतोय.
इतिहासाच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेलही.. पण पुराभिलेख संचालनालयाच्या या घोडचुकांमुळे दिशाभूल होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे हे पुस्तक तातडीने मागे घ्यावं तसंच पुस्तकाचं संपादन करणा-या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी इतिहास अभ्यासक आणि संशोधक करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.