`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस

पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 5, 2014, 06:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.
पंचगंगा नदिची उपनदी असणा-या कासारी नदीत या कारखान्यामार्फत थेट प्रदूषित पाणी साडलं जात असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दालमिया साखर कारखाना बंद करण्याचे आदेश दिलेत.कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पाच उपनद्या आहेत. या उपनद्यांच्या काठावर अनेक साखर कारखाने उभे आहेत..त्यापैकी दालमिया शुगर्सचा दत्त आसुर्ले पोर्ले हा साखर कारखाना कासारी नदी काठावर आहे.
या कारखान्यामार्फत दररोज प्रक्रिया न केलेलं लाखो लिटर पाणी थेट कासारी नदीत सोडलं जातंय. एवढच नव्हे तर नदीत दूषित पाणी मिसळत असणा-या ठिकाणापासून काही अंतरावर पन्हाळ्याला पाणी पुरवठा करणारा उपसा केंद्र आहे. त्यामुळे दूषित पाणी दररोज पन्हाळ्याबरोबरच इतर गावातील नागरीकांना प्यावं लागतं असल्याचं आभ्यास कमिटीच्या निदर्शनास आलय.
यापुर्वी पंचगंगा नदिच्या प्रदूषणाला जबाबदार असणा-या कारखान्यावर कठोर कारवाई करा असं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विनंती केली होती. पण प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र जो पर्यंत कोणी तक्रार देत नाही तो पर्यत बघ्याची भूमीका घेतं. त्यामुळं या नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
पंचगंगा नदिच्या प्रदुषणाला जबाबदार असणा-या दालमिया दत्त-आसुर्ले पोर्ले साखऱ कारखान्यावर कारवाई करत विज आणि पाणी नेक्शन तोडण्याचे आदेश प्रदुषण नियत्रण मंडळानं संबधीत विभागाला दिले आहेत. त्यामुळं दालमिया दत्त आसुर्ले साखर कारखान्याचा गाळीत हंगाम आता बंद होणाराय. पण कारखाना प्रशासनानं मात्र मुद्दाम नदीचं प्रदूषण केलं नाही असा दावा केलाय.
आतापर्यंत प्रुदषण नियंत्रण मंडळाकडुन कडक कारवाई केली जात नाही, म्हणुनच कारखानादार प्रदूषीत पाणी थेट पंचगंगा नदीत सोडण्याच धाडस करतायत. आता प्रदुषण नियंत्रण मंडळानं अशा घटकांवर कठोर कारवाईचा बगडा उगारत यांना कायमची अद्दल घडवायची वेळ येवुन ठेपली आहे. अऩ्यथा जुजबी आणि तात्पुरती कारवाई करुन पंचगंगा निदीचा प्रदूषणाचा प्रश्न मिटणार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.