`पुणेकरांना आलाय माज`, झुरमुरेंनी काढली लाज

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी "पुणेकर माजल्याचं" वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत भाजप, सेना आणि मनसेच्या सदस्यांनी महापालिकेत गोंधळ घातला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 17, 2012, 06:47 PM IST

www.24taas.com, पुणे
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी "पुणेकर माजल्याचं" वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत भाजप, सेना आणि मनसेच्या सदस्यांनी महापालिकेत गोंधळ घातला.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी ``जास्त पाणी वापरून पुणेकर माजले आहेत" असं विधान एका कार्यक्रमात केल्याचं सांगितलं जातंय. यामुळे संतप्त झालेल्या सेना-भाजप आणि मनसे सदस्यांनी महापालिकेत गोंधळ घातला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार घोषणाबाजी झाली...
मनसेचे नगरसेवक डोक्यावर शिंग घालून आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नरेश झुरमुरे यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला. सामान्य पुणेकरांनीही झुरमुरे यांच्या या विधानाबाबत संताप व्यक्त केलाय. झुरमुरेंच्या उचलबांगडीची मागणी विरोधकांनी केलीये. तर पुणेकरांचा अपमान होईल असं कुठलंही विधान केलं नसल्याचा खुलासा त्यांनी एका निवेदनाद्वारे केला.